Posts

उकीरडे

Image
        ओळींदरम्यान असलेल्या जागेत लपलेल्या आशयाचा ब्लॉग... वाचकांना काही किमान संदर्भ ठाऊक असल्यास तो सहज कळू शकतो....          एखादी रिकामी जागा(पक्षी:भूखंड)  अनधिकृत मार्गाने गिळंकृत करावयाची झाल्यास ती कचर्याने झाकून त्याचा सगळ्यात आधी उकिरडा करावा लागतो.          या राज्यातल्या ग्रंथालयांची वर्गवारी  जिथे सरकारला ठरवावी लागते व त्यानुसार अनुदानाचा जोगवा पदरात पाडून घ्यावा लागतो तिथे काय बोलावे?राज्यात ग्रंथालय संचालनालयावर येणारा माणूस(खरं तर चिपाड)  इतका सरकार धार्जिणा असतो कि तो राज्यातल्या अनुदानित सार्वजनिक वाचनालयांच्या  समस्यांकडे लक्ष पुरवून त्या सोडवायला जराही बांधील नसतो.  वाळवीला कागद नाशवंत आहे एवढेच कळत असल्याने आणि तिच्या ठायी तरतम भाव नसल्याने ती अख्खे संचालनालय पोखरून.. उध्वस्त करुन ठेवते. इतक्या दशकांपासून राज्यातल्या कर्मचार्यांचे महासंघ आपले जीवन मरणा एवढेच धगधगते प्रश्न उघड्यावर सनदशीर मार्गाने सार्वजनिक करीत आलेयत.... कोणातरी जनतेच्या सेवकाला त्यांची कळकळ क...

नक्षत्रांचे देणे

Image
|जादू|      भारतीय चित्रपट सृष्टीतील तारतारकांचं आपल्या रसिक प्रेक्षकांच्या भावविश्वाशी  फार जवळचं आणि चीवट नातं असतं.... देविका राणी पुढे स्वत: कशीही वागली असली तरी तिने या पेशीवरी (तरूण युसुफ खान) सफरचंदाचं केलेलं दिलीप कुमार हे नामकरण रुपेरी पडद्यासाठी आणि पल्याडही नेहमीच इतरांसाठी फलद्रूप ठरलं.... कलावंत तर ते होतेच परंतु माणुस म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध रंग लौकिक अर्थाने ते आपल्यात आज नसल्याने आहिस्ता आहिस्ता कळु लागतील....  त्रिशूळाची अग्रे      राज देव आणि दिलीप हे तीन या माया नगरीतील मनोरंजनाचे पाॅवर हाऊसेस चाहत्यांनी स्वीकारल्याने सरस असूनही अशोक कुमार, मोतीलाल, बलराज साहनी आणि किशोर कुमार, शम्मी कपूरलाही सर्व स्वीकारार्हतेसाठी मशक्कत करावी लागली होती.... या तिघांनी कितीतरी दशके अभिनयाचा शो सुरु ठेवून आपली अग्रे बोथट नाही होऊ दिली.. पण काळ पुरूषा मनोमनी नेहमीच वेगळा सिनॅरियो आधी बघत राहिला... यात प्रथम राज  नंतर विदेशात देव आणि आता भारताच्या भूमीत युसुफ मियाॅं.... माणूस म्हणून मी यांच्यापेक्षा काकणभर सरस अशा ...

९३

Image
|| आठ कम सेंकडा ! || उन्हाच्या तीव्रतम दीप्तिने तप्त धरेवर पहिल्या सरीचा शिडकावा होताच जो सुगंध रंध्रारंध्रात कोंदाटतो... त्याविषयी तक्रार नाहीच... तो जिरतो कुठे हे उमजत नाही... त्यामुळे तो शब्दांच्या चिमटीत धरता येत नाही... ल(लि)ता मंगेशकरांचे आजवरचे गायन हेच त्यांचे जीवन गाणे... आत्मचरित्र आहे...  कितने बरसकी हुई..बाई? चहाच्या टपरीलगत बसून विडी ओढणारा म्हातारा  विचारताच.. पोरसवदा चहावाल्याने क्रिकेटच्या बोलभाषेत उत्तर दिले... आठ कम सेंकडा... बोटंनाचवत तो  पुढे बोलला... यह दिल मांगे मोअर...बस्स.. दो चौके और.. लताबाईंचं मोठेपण त्यांनी सामान्यांतल्या सामान्य माणसाचं भावविश्व संपन्न करीत त्याला कायमचं श्रीमंत केलं...या सडाफटिंग माणसाने साध्या आरशात बघताच त्याला स्वत:चं आत्मचरित्र दिसू लागे... आणि हे संक्रमण लताबाई ंकडून आपल्याकडे झाल्याची जाणीव होत त्यांच्यातले नातं पुनश्च घट्ट आणि स्वीकारार्ह होऊन जाऊ लागलं.  लताबाई ंंना आपण सगळ्या ंनी मनाच्या सहाणावर अव्याहत उगाळतं ठेऊन ते अलौकिक गंध इतकी वर्ष...

लताशा

Image
हे या देशाचे अत्यंत दुर्मिळ स्त्री-धन आहे. कालच आशाबाईंचा वाढदिवस होता.... साक्षात सरस्वती चा वरदहस्त असताना आपण त्यात फक्त मिसळून जायचं असतं. लताबाई ंनी आपल्या नाट्य-संगितासाठी थोडी अधिक सवड काढायला हवी होती.... आशाबाई हे एकच मागणं आता या टप्प्यावर मागता येणारं आहे... दिलीप म्हैसाळकर. 

मर्हाटी स्त्री रचित रामकथा

Image
          या देशातल्या अठरापगड जातींच्या सामूहिक समाज मनात जिथे |रामनाम| आहे, त्यांना मी श्रीरामाचे महात्म्य सांगावे  अशी माझी पात्रताच नाही... वरील छायाचित्राने मात्र या भारतीय भूमीकन्येचे स्मरण तळमनातून वर तरंगत आले....            |रामराज्य| या भारतीय चित्रपटात सीतेची भुमिका वठविणार्या शोभनाबाई समर्थ यांचेही  स्मरण दीर्घजीवी  असल्याने असेच चाळवले.           महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांची पहाट जात्यावरच्या ओवीने आज होत  असेलच हे छातीठोकपणे नाही सांगता  येणार तरीही ग्रामीण मराठवाड्यातून पन्नासच्या दशकापूर्वी ती नक्कीच होत  होती.            मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नांदापूरच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर यांनी 'मुक्त मयूरांची भारते'हा प्रबंध नागपूर विद्यापीठात सादर केल्यावर पन्नासच्या दशकात त्यांनी डॉक्टरेट  मिळवली.              अशा या नांदापूरकर यांनी मराठवाड्याच...

शाश्वति

Image
आज तिची आठवण जरा अधिक दाट,गहिरेपणाने तरंगत वर येतेय. सुखदु:खाचा लवलेश नाही.माझ्या मनातून ती खरं तर गेलीच नाही.तिची प्रतिमा फ्रेश आहे.त्याला यंदा 33 वर्षे होतील. तिला आभासी अवकाशात आणून चीरस्मरणीय करायला तिने हरकत घेतली तर....बघू ! आईचेही स्मरण तस्सेच.अम्लान. माझ्याशी लग्नाची गाठ बांधताना चैत्रातला या दिवसाचा मुहुर्त निवडला होता तिने...कुलदेवदेवतेच्या पाया पडायला ती आली होती. ...... तिला मी आणि मला ती आज कुठाय ठाऊक नाही.गरज,आवश्यकता,निकड    काही उरले नाही. श्रीशिल्लक भ्रांत...      त्याच्या आवर्तात मी तीव्रतमगतीने गरगरतोय...हलका.....आभासी होतोय

कच्चे धागे... लता-दिलीपकुमार अनुबंध

Image
आपुलकी: आपण सगळे कोविड-१९ 'काळा'तून सध्या चाललोय...जगभर जिवंत माणसांच्या आरोग्यावर लादलेली ही महामारी 'तुमच्या' ठोस निदान,उपचार अन् प्रयत्नांशिवाय परतेलच कशी? एकमेकांच्या घरी जाणे तर राहोच, माणूस आपसात बोलण्याच्या, संवाद साधण्याच्या  मनस्थितीतही आज नाही...हिन्दी चित्रपटांचा 'तो काळ' मात्र आपलेपणामुळे भारलेला होता, असे जिवंत असलेले आवर्जून आठवांची स्मरणी ओढताना ऐकू येतात.. ते खरेही आहे... त्यामुळे कामं करताना सगळ्यांचेच प्रयत्न सार्थकी लागल्याची भावना वर्धिष्णू होत असे....  त्यातलं एक नाव लताबाई ंचं.....  कधी दिलीपकुमार यांनी लोकलचा एकत्र करताना लताच्या आवाजाला दाल-चावलची बू येत असल्याची टिप्पणी करुन छेड काढल्याची आठवण सांगतात... ते त्या मास्टर दीनानाथांच्या मानिनी कन्येस आवडले नव्हते... तोच तिचा हा मोठा भाऊ देशात विदेशात जाहीर कार्यक्रमात तिच्याविषयी जनसमुदायापुढे संवाद साधायला किती आंतून... निर्भेळ... निर्वीष बोलताना आपण सगळ्यांनीच कितीतरी वेळा ऐकलंय... तोच त्यांच्यामधला हा अतूट मूॅहबोले भाईबहनचा  अनुबंध... मानली तर नाती.. नाही तर एका जन...