कच्चे धागे... लता-दिलीपकुमार अनुबंध
आपुलकी:
आपण सगळे कोविड-१९ 'काळा'तून सध्या चाललोय...जगभर जिवंत माणसांच्या आरोग्यावर लादलेली ही महामारी 'तुमच्या' ठोस निदान,उपचार अन् प्रयत्नांशिवाय परतेलच कशी? एकमेकांच्या घरी जाणे तर राहोच, माणूस
आपसात बोलण्याच्या, संवाद साधण्याच्या मनस्थितीतही आज नाही...हिन्दी चित्रपटांचा 'तो काळ' मात्र आपलेपणामुळे भारलेला होता, असे जिवंत असलेले आवर्जून आठवांची स्मरणी ओढताना ऐकू येतात.. ते खरेही आहे... त्यामुळे कामं करताना सगळ्यांचेच प्रयत्न सार्थकी लागल्याची भावना वर्धिष्णू होत असे....
त्यातलं एक नाव लताबाई ंचं.....
कधी दिलीपकुमार यांनी लोकलचा एकत्र करताना लताच्या आवाजाला दाल-चावलची बू येत असल्याची टिप्पणी करुन छेड काढल्याची आठवण सांगतात... ते त्या मास्टर दीनानाथांच्या मानिनी कन्येस आवडले नव्हते... तोच तिचा हा मोठा भाऊ देशात विदेशात जाहीर कार्यक्रमात तिच्याविषयी जनसमुदायापुढे संवाद साधायला किती आंतून... निर्भेळ... निर्वीष बोलताना आपण सगळ्यांनीच कितीतरी वेळा ऐकलंय... तोच त्यांच्यामधला हा अतूट मूॅहबोले भाईबहनचा अनुबंध... मानली तर नाती.. नाही तर एका जन्मातल्या गाठी..!
दिलीप म्हैसाळकर.
Comments
Post a Comment