मर्हाटी स्त्री रचित रामकथा


          या देशातल्या अठरापगड जातींच्या सामूहिक समाज मनात जिथे |रामनाम| आहे, त्यांना मी श्रीरामाचे महात्म्य सांगावे 
अशी माझी पात्रताच नाही... वरील छायाचित्राने मात्र या भारतीय भूमीकन्येचे स्मरण तळमनातून वर तरंगत आले.... 
          |रामराज्य| या भारतीय चित्रपटात सीतेची भुमिका वठविणार्या शोभनाबाई समर्थ यांचेही  स्मरण दीर्घजीवी  असल्याने असेच चाळवले.
          महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांची पहाट जात्यावरच्या ओवीने आज होत  असेलच हे छातीठोकपणे नाही सांगता  येणार तरीही ग्रामीण मराठवाड्यातून पन्नासच्या दशकापूर्वी ती नक्कीच होत  होती. 
          मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नांदापूरच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर यांनी
'मुक्त मयूरांची भारते'हा प्रबंध नागपूर विद्यापीठात सादर केल्यावर पन्नासच्या दशकात त्यांनी डॉक्टरेट  मिळवली. 

            अशा या नांदापूरकर यांनी मराठवाड्याचा ग्रामीण भाग स्वत: फिरुन या अशिक्षीतांकडून गोळा केलेल्या ओव्यांतून रामकथेला घडणावळ बहाल केली... 
            रामायणात सीता नसती (किंवा महाभारतात द्रौपदी नसती तरच) ते घडतेच ना...!     
             वरील ग्रंथाचे मुखपृष्ठ नांदेड चे एक सिद्धहस्त चित्रकार भ. मा.  परसावळे यांना दाद द्यावीच लागेल. 
            या पुस्तकाचा वर्ण्य विषय 'समूह महानाट्या'तून कसा उलगडतो, ते बघावे लागेल... त्यासाठी संस्कार-भारती सारख्या समूहाला पुढाकार घ्यावा लागेल.
             रामनाम वेगळे आणि रामकथा वेगळी.रामनाम घेण्याचा अधिकार याजगातल्या सजीवांना आहे.रामकथा ही नेहमीच पुरुषाने सांगितली आहे पण अर्हता चा जरा विचार केला तर ही राम कदा(शरयू) नदीनेच विशद करायल हवी कारण ती तिच्या जन्मा आधीपासून सलिल रुपात या भुमीवर कार्यरत होती आजही ती आहे आणि आपल्या अस्तित्वानंतरही शरयू वाहती राहणार आहे.
              डॉ. नांदापूरकर यांचा विशेष हा कि जगात सर्वात सरळ,सोप्या अशा ओवी या काव्यप्रकारात ओवलेली मराठवाड्यातील ग्रामीण भागात फिरुन जात्यावर आळवलेली मराठी महिलांनी  वेचलेली रामकथा त्यांनी संकलित करून त्यावर संशोधनात्मक संस्कार करुन सिध्द केली.त्यांच्या या मौलिक प्रयासाला उस्मानाबाद विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन यथोचित सन्मानीत केले.
             आज रामनवमी...नांदापूरकर यांच्या कष्टपूर्वक उजेडात आणलेल्या मर्हाटी स्त्रीरचित रामकथेचं पारायण ते वाचून मराठी माणसाने त्यांना अभिवादन करणे अगदीच अप्रस्तुत  ठरणार नाही.
                सीयावर रामचंद्र भारतीय मानसात चिरस्थायी विराजमान आहेत....
दिलीप म्हैसाळकर 


             

Comments

Popular posts from this blog

९३

फिर दिलीप कुमार....