उकीरडे

        ओळींदरम्यान असलेल्या जागेत लपलेल्या आशयाचा ब्लॉग... वाचकांना काही किमान संदर्भ ठाऊक असल्यास तो सहज कळू शकतो.... 
        एखादी रिकामी जागा(पक्षी:भूखंड)  अनधिकृत मार्गाने गिळंकृत करावयाची झाल्यास ती कचर्याने झाकून त्याचा सगळ्यात आधी उकिरडा करावा लागतो.          या राज्यातल्या ग्रंथालयांची वर्गवारी  जिथे सरकारला ठरवावी लागते व त्यानुसार अनुदानाचा जोगवा पदरात पाडून घ्यावा लागतो तिथे काय बोलावे?राज्यात ग्रंथालय संचालनालयावर येणारा माणूस(खरं तर चिपाड)  इतका सरकार धार्जिणा असतो कि तो राज्यातल्या अनुदानित सार्वजनिक वाचनालयांच्या  समस्यांकडे लक्ष पुरवून त्या सोडवायला जराही बांधील नसतो. 
वाळवीला कागद नाशवंत आहे एवढेच कळत असल्याने आणि तिच्या ठायी तरतम भाव नसल्याने ती अख्खे संचालनालय पोखरून.. उध्वस्त करुन ठेवते. इतक्या दशकांपासून राज्यातल्या कर्मचार्यांचे महासंघ आपले जीवन मरणा एवढेच धगधगते प्रश्न उघड्यावर सनदशीर मार्गाने सार्वजनिक करीत आलेयत.... कोणातरी जनतेच्या सेवकाला त्यांची कळकळ काळजापर्यत जाऊन भिडलेली आजतागायत दिसली कां.... मतांसाठी पावसात मतदारांच्या नावाने आंघोळ करणारे विरोधी पक्षनेते... त्यांना तरी कणव जाणवली कां.... शंभरी गाठणारी राज्यातली अ वर्ग सरकारी अनुदानित ग्रंथालयांवर कव्हर स्टोरी करणारी आपली माध्यमं.... त्यांनी तरी हे उकिरडे साॅर्ट करून पहिले आहेत का..? 
आर्वी (जि.वर्धा) आणि बारामती तुलना करण्यायोग्य तालुके. आर्वीतल्या लोकमान्य वाचनालयातली(अ वर्ग) कोंडून ठेवलेली ऐवजदार संदर्भ ग्रंथसंपदा बघण्यासाठी उघडून दाखवली तर नव्या
 कोर्या ग्रंथांवर व्हिक्टोरिया राणीचा अमिट शिक्का.... (उरलेला मजकूर पुढील ब्लॉग मध्ये) दिलीप म्हैसाळकर

Comments

Popular posts from this blog

मर्हाटी स्त्री रचित रामकथा

९३

फिर दिलीप कुमार....