९३
|| आठ कम सेंकडा ! ||
उन्हाच्या तीव्रतम दीप्तिने तप्त धरेवर पहिल्या सरीचा शिडकावा होताच जो सुगंध रंध्रारंध्रात कोंदाटतो... त्याविषयी तक्रार नाहीच... तो जिरतो कुठे हे उमजत नाही... त्यामुळे तो शब्दांच्या चिमटीत धरता येत नाही... ल(लि)ता मंगेशकरांचे आजवरचे गायन हेच त्यांचे जीवन गाणे... आत्मचरित्र आहे...
कितने बरसकी हुई..बाई? चहाच्या टपरीलगत बसून विडी ओढणारा म्हातारा
विचारताच.. पोरसवदा चहावाल्याने क्रिकेटच्या बोलभाषेत उत्तर दिले... आठ कम सेंकडा... बोटंनाचवत तो पुढे बोलला... यह दिल मांगे मोअर...बस्स.. दो चौके और..
लताबाईंचं मोठेपण त्यांनी सामान्यांतल्या
सामान्य माणसाचं भावविश्व संपन्न करीत त्याला कायमचं श्रीमंत केलं...या सडाफटिंग माणसाने साध्या आरशात बघताच त्याला स्वत:चं आत्मचरित्र दिसू लागे... आणि हे संक्रमण लताबाई ंकडून आपल्याकडे झाल्याची जाणीव होत त्यांच्यातले नातं पुनश्च घट्ट आणि स्वीकारार्ह होऊन जाऊ लागलं.
लताबाई ंंना आपण सगळ्या ंनी मनाच्या सहाणावर अव्याहत उगाळतं ठेऊन ते अलौकिक गंध इतकी वर्षे वाळू दिलं नाही, हे आम्हा भारतीयांचं केवढे भाग्य... लताबाईंचा आजवरचा त्याग आणि त्यामागचा कणखर बाणा जपणं सगळ्यांना जमणार तरी कसा...
लताबाईंच्या बड्डे'ला जो आनंद मनाला होतो त्याची तुळणा मृद् गंधाशीच मला करावीशी वाटते
आज लताबाई आठवतात त्या ऊर्ध्वमूल मध:शाख... गाताना... आणि हे मावळत नाही तर उसळून वर येतो जीवनदर्शन घडविणारा...गालिब सुटा करुन दाखविणारा त्यांचा निर्मम करणारा अपार्थीव स्वर....
दिलीप म्हैसाळकर.
Comments
Post a Comment