||ज्येष्ठांतले ऊन||
मांडलेल्या उच्छादाने विषाणू-१९ थकला असावा.महाराष्ट्र अनलॉक🔓 नाही झाला? आता माणसामाणसातल्या चैतन्यरूपाचं दळणवळण सुरु होईल.
माणसं बैजवार पूर्ववत शिस्तीत सरळ होऊन पुनश्च जगायला बाहेर पडतील.
पुन: जागोजागी काव्य-शास्त्र-विनोदाचे फड रंगातल.
सन्माननीय नारळीकर कुलोत्पन्न विष्णूपुत्र जयंतराव यांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण तेवढे करायला मिळो.
आणि हो... शरदच्चंद्र पवार यांना साहित्य संमेलनात पुन्हा एकदा आराम पडून अभ्यासपूर्ण वाड्मयीन बॅटिंगची संधी गवसो!
दिलीप कुमारने या जन्मात सायरा बानोचे ऋण फेडता येत नसल्यास पुढील जन्मी तिच्या उदरी जन्मून हिशेब चुकता करावा....
दिलीप म्हैसाळकर
Comments
Post a Comment